राजकारणातील उपभोग शुन्य स्वामी-अण्णासाहेब भोसले

Cityline Media
0
​७८ व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख:ज्ञान,अनुभव आणि समर्पणाचे चालते-बोलते विद्यापीठ!

​आश्वी संजय गायकवाड राजकारणातील सेवाभावी उपभोगशुन्य स्वामी म्हणजे आण्णासाहेब भोसले हे आज ७८ वर्षांचे होत आहेत.संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीत ज्यांचे नाव राजकारणातील 'ऋषितुल्य व्यक्तिमत्व' म्हणून आदराने घेतले जाते,ते म्हणजे आण्णासाहेब भोसले.त्यांची स्मरणशक्ती,विद्वत्तेचा अथांग सागर आणि हजरजबाबी समोरच्याच्या अकलनापली कडील व्यासंगी आवाका या सर्व गुणांचे ते मूर्तिमंत रूप आहेत.
एक तर गारीच्या पोटी हिरा जन्मतो नाहीतर नारीच्या ​पोटी धन्य ते मातृ पितृ ज्यांच्या पोटी अशी व्यक्ती जन्माला आली आज अण्णासाहेब भोसले प्रवरा चाळीसक्रोशीत ज्ञान,अनुभव आणि सामाजिक समर्पणाचे चालते-बोलते विद्यापीठ बनले जणू उघडे पुस्तकच!

लोकप्रतिनिधी पदाचा निसटता विजय हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा आहे १९८५ साली संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होता-होता राहून गेलेल्या आण्णासाहेबांनी त्या पराभवाची खंत कधीही चेहऱ्यावर आणली नाही.उलट, त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी समाजकारणात अधिक जोमाने काम केले. कट्टर विरोधकांनाही भुरळ पाडणारे त्यांचे नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि प्रभावी संघटन कौशल्य आजही तितकेच प्रभावी आहे.

​स्मरणशक्ती थक्क करणारी, विद्वत्तेचा अथांग सागर, समोरच्याच्या बुद्धीपलीकडचा व्यासंगी आवाका हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य! आश्वी खुर्दच्या विकासाचा आधारस्तंभ असलेले अण्णासाहेब भोसले एक उपभोग शून्य स्वामीच आश्वी खुर्द गावाच्या प्रत्येक गल्लीतून तेथील लोकांच्या मनापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे.

शिक्षण,आरोग्य,शेती, सहकार आणि सांस्कृतिक विकास ही त्यांच्या योगदानाची प्रमुख क्षेत्रे आहेत.त्यांच्या प्रयत्नातून गावात प्राथमिक आरोग्य केंद्र,पोस्ट ऑफिस,सेवा सहकारी सोसायटी,ग्रामपंचायत,आठवडे बाजार, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा बँकेची शाखा अशा अनेक संस्थांची स्थापना झाली. ते खऱ्या अर्थाने आश्वी खुर्दच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत.

​आधुनिक शेतीचे प्रणेते: 'शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार
​१९७५ साली राज्य सरकारकडून 'शेतीनिष्ठ शेतकरी' हा मानाचा पुरस्कार मिळवणारे ते अहमदनगर जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले.
​नवनवीन प्रयोग करणे ही त्यांची आवड.आधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इस्रायल, इजिप्त, तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, जर्मनी अशा अनेक देशांचा दौरा केला.
​त्यांचा शेतीमधील अभ्यास आणि योगदान आजही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरते.

​राजकारणातील मैत्री आणि निष्ठा
​राजकारणात असूनही आण्णासाहेबांनी कधी कटुता बाळगली नाही. दिवंगत मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्यासोबतचे त्यांचे मैत्र सर्वश्रुत आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे त्यांनी खताळ पाटील यांच्या सूचनेनुसारच ठरवले होते. दिल्लीतील समीकरणांमुळे तिकीट कापले गेले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी कटुता दिसली नाही.

​वयाच्या वीसाव्या वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेल्या आण्णासाहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव व शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव व बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार अशा दिग्गज नेत्यांशी आपुलकीचे संबंध जपले. विखे पाटील कुटुंबाच्या चार पिढ्यांशी त्यांनी आपले अतूट नाते आजही तितक्याच निष्ठेने टिकवून ठेवले आहे.

​७८ व्या वर्षीही अविश्वसनीय ऊर्जा!
​आज ७८ व्या वर्षीही त्यांची ऊर्जा अविश्वसनीय आहे.
​सकाळची सुरुवात शेतीला फेरफटका मारून करणे.
​गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणे.
​निवडणुकीत पायाला भिंगरी लावून फक्त विकासाच्या मुद्यावर प्रचार करणे.

​हा त्यांचा उत्साह नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे.
​अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला, समाजकारणाचा आदर्श आणि राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या आण्णासाहेब भोसले यांना त्यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!