भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Cityline Media
0
नाशकात ३ हजार तर त्र्यंबकेश्वरला १ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी

नाशिक दिनकर गायकवाड आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी जोमात सुरू झाली आहे. याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरात तब्बल तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे तर त्र्यंबकेश्वरला एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीला मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सीटीचे सीइओ सुमंत मोरे उपस्थित होते.बैठकीत आगामी कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख घाट परिसर, पंचवटी, गंगापूर रोड, सिटी सेंटर मॉल परिसर, सीबीएस, त्र्यंबकेश्वर तसेच महत्त्वाच्या चौकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे मनपाच्या 'इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर' शी थेट जोडले जाणार असून, त्याद्वारे तत्काळ निरीक्षण, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसादाची व्यवस्था केली जाईल.

याशिवाय, विद्यमान सीसीटीव्ही नेटवर्क, फायबर ऑप्टिक केबल टाकणे, - तसेच उच्च रेझोल्यूशन व नाईट व्हिजनचे कॅमेरे बसविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्या दरम्यान गर्दीचे व्यवस्थापन,हरविलेल्या व्यक्तींचा शोध, गुन्हे प्रतिबंध, तसेच वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षमपणे करण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!