कुख्यात गुंड टोनू म्हस्के नाशिक रेल्वे ठाणे परिसरातून जेरबंद

Cityline Media
0
नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टयासह केली अटक 

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहर येथील पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा करणारे आरोपी यांचेवर लक्ष ठेवुन त्यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस करणे बाबत कळविण्यात आले होते.
नाशिकरोड पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ५६३/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३३१,३१० (२), ३५१ (२) शस्त्र अधि ४/२५,३/२५ मपोका अधि. १३५ प्रमाणे दाखल असुन गुन्हयातील आरोपी यांनी फिर्यादी यांचे पोटाला पिस्तुल लावुन धाक दाखयुन फिर्यादी यांच खिशातुन ११०० बळजबरीने काढून घेतले व फिर्यादी यांचे डोक्यात धारधार हत्याराने वार करून पळुन गेले अशी फिर्याद दिल्याने त्यावरून नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी हे तात्काळ अटक करणे बाबत पोलिस निरिक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आदेशित केले होते.

या सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असतांना पोलिस अधिकारी.अजय देशमुख,पोलिस अधिकारी विशाल कुंवर यांना गुप्त खबऱ्या मार्फत फोन आला की,टोनु म्हस्के हा रेल्वे ठाणे परिसरात मोटार सायकलवर आला आहे.

हि वार्ता मिळाल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहीती देवुन त्यांनी या बातमीची खात्री करणे कामी पोलिस निरीक्षक बडे नाईकवाडे (गुन्हे) यांना व पोहवा विजय टेमगर , पोअं. समाधान वाजे, पोअं.नाना पानसरे, पोअं. विशाल कुंवर, पोअं.अजय देशमुख यांना डीबी मोबाईल सह रवाना केले. 

हा आरोपी हा पोलीस गाडीला पाहुन त्याचे मोटार सायकलवर सुभाषरोड मार्गे मालधक्कारोड कडे पलायन केले असता पोलिसांनी या आरोपी वा सरकारी वाहनाने पाटलाग करून गुलाबावाडी मालधक्कारोड येथे शितापीने आरोपी नामें हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोनु पाईकटराव यास मोटारसायकल सह ताब्यात घेतले,त्यास पुढील तपास कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी अटक करून त्याचे कडुन गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले.

जप्त मुद्देमाल-
१) २५००० /- रूपये किंमतीचा गावठी कटटा (पिस्तुल) जु.वा.कि.अं.

२) ६०,०००/-रूपये किंमतीची गुन्हयात करते वेळी वापरेलेली केटीएम कंपनिची २०० ही मोसा.जप्त करण्यात आली.

३)११००रूपये त्यामध्ये भारतीय चलनातील ५०० दराची ०१ नोट, २०० दराची ०२ व १०० दराची ०२ नोटा जप्त करण्यात आले.
एकुण:- ८६,१००-रूपये
तसेच आरोपी नामे हर्ष सुरेश म्हरके उर्फ टोनु पाईकराव हा नाशिकरोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे मधील विविध गुन्हयात पाहीजे आरोपी आहे.सदर गुन्हे खालील प्रमाणे:-

१) नाशिकरोड पोलीस ठाणे गुर नं. ४५७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३१० (२), शस्त्र अधि ४/२५, मपोका अधि १३५ प्रमाणे,
२) नाशिकरोड पोलीस ठाणे गुरनं. ४५७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३३१,३१० (२), ३५१ (२) शरत्र अधि ४/२५,३/२५मपोका अधि १३५ प्रमाणे.
३) उपनगर पोलीस ठाणे गुरनं. २९८/२०२५ भा. न्या. संहिता कलम १०९,१९४(२), शरत्र अधि ३/२५ प्रमाणे.
४) उपनगर पोलीस ठाणे गुरनं. २९८/२०२५ भा. न्या. संहिता कलम १०९,३५२, ३५१ (२), ३(५) प्रमाणे,
सदर आरोपी यास अटक केलेल असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/जितेंद्र माळी हे करीत आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उपआयुक्त,परिमंडळ-२,किशोर काळे जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक बडे नाईकवाडे,तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी,

पोह विजय टेमगर,पोहवा सहायक पोलीस आयुक्त,नाशिकरोड विभाग संगिता निकम याचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलिस शिपाई विशाल कंवर,नाना पानसरे,अजय देशमुख, समाधान वाजे,नितीन भामरे,महेंद्र जाधव, अरून गाडेकर,सागर आडणे, योगेश रानडे, गोवर्धन नागरे,संतोष पिंगळ यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!