संगमनेर प्नतिनिधी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांना पंचायत समिती निवडणुकीसाठी घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.घुलेवाडी गणातून बंटी यादव यांना गुप्त मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे मतदार परिवर्तन घडवून आणू शकतील असे बोलले जातेय त्यांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील अशी चर्चा आहे.
बंटी यादव हे काँग्रेसचे विचार जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे सामाजिक आणि राजकीय संबंध असल्यामुळे त्यांना घुलेवाडी गणातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
त्यांची उत्तम संघटनात्मक कौशल्य आणि प्रचंड लोकप्रियता यामुळे त्यांना घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्यात यावी अशी गुप्त मागणी केली जात आहे त्यात श्री.यादव यांनी घुलेवाडी गणातील मतदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहे.
मतदारांचा कौल निश्चितीतच आहे आहे असा त्यांचा अंदाज दिसतोय.काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून काम करत असताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत असताना जनतेच्या समस्या बघितल्या आणि त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.
मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मतदार संघात देखील आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे घुलेवाडी गणातील त्यांना उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे त्यांच्या कृतिशील कामाला गती येईल बंटी यादव यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा सुशिक्षित आणि लोकांच्या सुखदुःखासाठी धावून येणार आहे उमेदवार शोधूनही सापडणार नाही काँग्रेस तर्फे घुलेवाडी गणातून बंटी यादव यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे अनेक नेते प्रयत्नशील असल्याचे बोलले जातेय.
