नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त तथा मुख्य प्रशासक मनीषा खत्री यांनी बी. डी. भालेकर हायस्कूल बचाव कृती समितीचा विरोध झुगारून नुकतेच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शालिमार येथील बी. डी. भालेकर शाळेवर हातोडा चालविण्यास मंजुरी दिली.
नाशिक महानगर-पालिकेची ही इमारत जीर्ण झाली असल्याने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शाळा बचाव कृती समिती प्रचंड आक्रमक झाली असून शाळा वाचविण्यासाठी आरपारची लढाई लढलीजाईल, असा इशारा त्यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. ते पाहता येत्या काळात हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
बी. डी. भालेकर शाळा जवळपास पन्नास वर्षे जुनी आहे. मनपाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शाळेची इमारत जीर्ण झाल्याचे नमूद केले आहे. तसेच तिचा दुरुस्ती व देखभालीचा खर्च जादा येणार होता.त्यामुळे मनपाने ही शाळा पाडण्याचा निर्णय घेतला. रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या धर्तीवर या शाळेचे पाडकाम केले जाणार आहे.
