झरेकाठी सोमनाथ डोळे भारत सरकारच्या नीती आयोगांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अटल इनोव्हेशन मिशन यांच्या राष्ट्रीय एस टी इ एम स्पर्धेत महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणून राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयासोबत २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
बदलत्या काळानुसार विद्यालय आधुनिकतेकडे वाटचाल करत असून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमांची संधी उपलब्ध करून देत भविष्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य के. बी.बारगुजे यांनी दिली.
या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती यांना चालना मिळून डिझाईन थिंकिंग, संगणकीय विचारसरणी,अनुकूली शिक्षण,भौतिक संगणन यांसारखी नवयुगातील अत्यावश्यक कौशल्ये विकसित होतात.
विद्यार्थ्यांना ‘स्वतःकरून पाहणे’ या पद्धतीवर आधारित विविध क्रियाकलापांद्वारे नाविन्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्याची आणि आपल्या कल्पनांना मूर्त रूप देण्याची संधी या लॅबमध्ये उपलब्ध होते.
विज्ञान व तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्राशी संबंधित नवीनतम सरकारी उपक्रम,योजना आणि धोरणांशी सुसंगत कार्य केल्याच्या निकषांवर हा प्रतिष्ठित पुरस्कार विद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे,मा.मंत्री आण्णासाहेब म्हस्के ,जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ.शालिनी विखे, मा. खासदार डॉ. सुजय विखे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे,प्रवरा
अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे ,सचिव भारत घोगरे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अ-तांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,
केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर, स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष शशिकांत लक्ष्मण घोलप, सरपंच उमेश घोलप,पत्रकार सोमनाथ डोळे, बलराज पाटील, रमेश पन्हाळे, पारजी धनवट, रवींद्र दिघे,मंदा डुक्रे, अशोक अंत्रे,यांसह सर्व मान्यवर, स्थानिक स्कूल कमिटी व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आणि पाथरे बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
