नाशिक दिनकर गायकवाड शहरातील इंदिरानगर व बोधलेनगर येथून दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहनचोरीचा पहिला प्रकार इंदिरानगर परिसरात घडला. फिर्यादी प्रसाद विलास कुलकर्णी (रा. शिल्पविहार सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) यांनी इंदिरानगर येथील डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस प्रा. लि.जवळ १५ हजार रुपये किमतीची हिरोहोंडा प्लेझर मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास
पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
वाहनचोरीचा दुसरा प्रकार बोधलेनगर येथे घडला. फिर्यादी मिलिंद शरद कुलकर्णी (रा. शिल्पराज रेसिडेन्सी, आर. टी. ओ. कॉलनी रोड, बोधलेनगर, नाशिक) यांनी राहत्या घराजवळ एमएच १५ एजे ५९७३ या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
