'शिक्षणामुळेच माणूस समाजात माणूस आत्मविश्वासाने बोलतो' - आमदार सत्यजित तांबे
-प्राचार्य अशोक गीते यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आमदार तांबे भावूक; 'ज्ञानदानाचे कार्य थांबू नये' अशी भावनिक साद
आश्वी संजय गायकवाड नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या शालेय जीवनातील गुरुजनांविषयी तीव्र कृतज्ञता नुकतीच व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाचे प्राचार्य अशोक नामदेव गीते यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना, गीते शिक्षकांनी दिलेल्या इंग्रजी विषयाच्या शिकवणीमुळेच आज आपण जगात कुठेही आत्मविश्वासाने बोलू शकतो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
गुरुजनांना यशाचे श्रेय देत प्राचार्य अशोक गीते यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आमदार तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:प्रसंगी आमदार तांबे म्हणाले: "माझ्या यशाचं मोठं श्रेय माझे गुरुजन, विशेषत: अशोक गिते सरांना देतो. त्यांनी इंग्रजी विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवला,ज्यामुळे आज मला इंग्रजी बोलताना कधीच अडचण जाणवत नाही.माझ्या व्यक्तिमत्त्व घडणीत सरांचं योगदान अमूल्य आहे."
आमदार तांबे यांनी समारोपावेळी, "सर वयोमानानुसार निवृत्त होत असले तरी त्यांनी ज्ञानदानाचे कार्य थांबवू नये," अशी भावनिक साद घातली.शिक्षण क्षेत्रात तब्बल ३१ वर्षे निष्ठापूर्वक सेवा देणाऱ्या आणि हजारो विद्यार्थ्यांचे जीवन फुलवणाऱ्या या आदर्श शिक्षकाचा गौरव सोहळा नारायण नागरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते अशोक गीते व त्यांच्या पत्नी सौ.सविता गीते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ज्ञानदानाला सामाजिक जोड:
या सेवापूर्तीच्या निमित्ताने लोकसहभागातून सामाजिक कार्याची प्रेरणा दिसून आली.
गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपये जमा करून शाळेत चार इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्यात आले.यातील एक बोर्ड प्राचार्य गीते यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेला भेट दिला,ज्याचे लोकार्पण देखील आमदार तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नामदेवराव गीते, तहसीलदार सौ.चैताली दराडे, निवृत्ती सांगळे, डॉ. रामदास आंधळे,डॉ भानुदास आंधळे, शांताराम फड, रंगनाथ फड, संपत सांगळे,अंकुश कांगणे, दिलीप नागरे ,ग्रामविस्तार अधिकारी नागरे, सखाराम भाऊ नागरे,सुभाष नामदेव गीते, डॉ. किरण गिते,अशोक गीते,प्रा.कान्हु गिते अशोक गिते कैलास आंधळे, गुणाभाऊ आंधळे, दत्तू नागरे, ज्ञानेश्वर साळवे, सखाराम कदम,सरपंच राजेंद्र बर्डे, सुरेश फड, सतपाल नागरे, शितल उगलमुगले, भारती नागरे, तसेच सत्कारमुर्ती गीते सरांचे कुटुंबीय- मुलगा अमित अशोक गीते व सून सौ.अदिती अमित गीते यांची उपस्थिती होती.
यांच्यासह सह्याद्री परिवार,शेडगाव ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास काकड यांनी केले, तर चंदन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
