बालदीन निमित्त साकूर जिल्हा परिषद शाळेतील विध्यर्थ्याशी आत्मीय संवाद
साकूर युनूस शेख विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अतिशय मोठे आहे. ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण मिळाले,तर त्यांची क्षमता अमर्याद आहे.”शासनाबरोबरच ग्रामस्थ,पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार संधी द्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा यांनी साकूर येथे केले.
बालदिन चिमुकल्या डोळ्यांतील चमक,स्वप्नांच्या रंगीत आकाशात भरारी घेण्याची आंतरिक उर्मी,आणि मनात दडलेल्या असंख्य शक्यता!याच भावनेचा उर्जा भरलेला दिवस संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद शाळेत रंगला, जेव्हा जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा.यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधत बालदिनाचा आनंद द्विगुणित केला.चिमुकल्यांच्या दुनियेत डोकावलेला आत्मीय क्षण बालदिनानिमित्त झालेल्या संवादात मुलांच्या चैतन्याने वातावरण भारून गेले.त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांतून आणि उत्साही दृष्टिकोनातून ग्रामीण महाराष्ट्राच्या उज्ज्वल उद्याचा प्रकाश झळकत होता.
प्रसंगीविखे पा.म्हणाले की “ग्रामीण भागातील मुलांची निरागस जिज्ञासा आणि भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा आत्मविश्वास पाहिला की उद्याचा दिवस निश्चितच उजळणारा आहे. ”मुलांनी शैक्षणिक आवडी, खेळ, कला, विज्ञान आणि निसर्गाबद्दल व्यक्त केलेल्या मतांतून त्यांच्यातील प्रगतीची भूक आणि परिस्थितीला न घाबरणारी जिद्द अनुभवायला मिळाली.“या कुतूहलात भविष्यातील वैज्ञानिक, अधिकारी, खेळाडू आणि कलाकार दडलेले आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शाळेच्या गरजा.शिक्षकांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, ग्रंथालय,संगणक सुविधा, क्रीडा साहित्य आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींची माहिती दिली. या संवादातून शिक्षक–विद्यार्थी–शासन यांच्यातील एक बळकट शैक्षणिक पूल बांधण्याची प्रक्रिया अधिक दृढ झाली.
मुलां मध्ये दडलेले आहेत राष्ट्राचे भावी शिल्पकार”उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांमध्ये आशेची नवी जागरणे निर्माण करणारे शब्द उच्चारत ते म्हणाले ही मुले फक्त विद्यार्थी नाहीत ती राष्ट्राची भावी शिल्पकार आहेत.योग्य दिशा, योग्य संधी आणि योग्य वातावरण मिळाल्यास ही मुले उद्याचे डॉक्टर,अभियंते, अधिकारी,उद्योजक आणि समाज परिवर्तन करणारे मोठे नेते बनू शकतात.”
बालदिनाचा अर्थच उजळून निघाला बालदिन फक्त एखादा कार्यक्रम नाही;चिमुकल्या मनांना स्पर्श करणारा, त्यांच्या स्वप्नांना पंख देणारा आणि त्यांच्या भविष्याचे नवे क्षितिज दाखवणारा दिवस आहे.
