डिग्रस येथे विविध विकासकामांचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते लोकार्पण

Cityline Media
0
सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे विविध विकासकामांचा शुभारंभ जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ  यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हरीबाबा कोरडकर हे होते.
यावेळी संगमनेर तालुक्यातील  शेतकरी नेते संतोष रोहम, गुलाब सांगळे,भाजप सरचिटणीस संदीप घुगे, गोकुळ दिघे,अंकुश कांगणे, नवनाथ वर्पे, जेऊर शेख, माऊली वर्पे, दिलीप मुन्तोडे, सरपंच अशोक खेमनर, उपसरपंच रंगनाथ बिडगर, शरद भालेराव, संपतराव खेमनर,किसन हळनर, शिवभक्त लक्ष्मण होडगर, मच्छिंद्र हळनर, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कलगुंडे, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, मुख्याध्यापक अजिनाथ घोडके, जलसंपदा विभागाचे माने, महसूल अधिकारी गायकवाड आप्पा, ग्रामसेवक रुपाली कहाणे, उत्तम वर्पे,अर्जुन हळनर, गंगाराम गवारी, बंडू नाना देशमुख, शिवाजी पुणेकर, मच्छिंद्र तांबडे, ज्ञानदेव श्रीराम, रामा बर्डे, संतू खेमनर, भारत गीते, पोपटराव वाणी, दगडू बिडगर, ॲड. संदीप जगनर, कालीचरण पुरी, सावळेराम बिडगर, जाखु जाधव, लहानू बिडगर, संजय बिडगर, साहेबराव नान्नर, नारायण कहार, सोमनाथ डोळे, अशोक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राधाकृष्ण विखे पा.यांनी घेतली तालुक्यातील विकासाची गांभीर्याने दखल घेत त्यांनी आपल्या भाषणात “दिवंगत रखमाजी खेमनर यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भागासाठी समर्पित केले.त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच या भागाचा विकास आज गती घेत आहे.” बिहार निवडणुकीत विरोधकांचा “सुपडा साफ” झाल्याचा उल्लेख करत, “जनतेचा विश्वास गमावलेले लोक मतचोरीचा आरोप करून गोंधळ माजवतात. बिहारने त्यांना प्रत्युत्तर दिले.” राहुल गांधींबाबत टीका करताना ते म्हणाले, “परदेशात जाऊन टीका करतात; आता तिथेच राहिलेले बरे.”महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अधोगतीकडे बोट दाखवत, “उमेदवारी घेण्यास कोणी तयार नाही,जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.” महाविकास आघाडीवर आरोप करत, “सत्तेत येऊन जनतेला काहीच दिले नाही; जनतेने घरचा रस्ता दाखवला.”


तसेच महायुती सरकारच्या योजनांवर भाष्य करत ते म्हणाले , “लाडकी बहीण योजना फसवी असल्याचे म्हणणारेच आज तिचे कौतुक करताना दिसतात.वेळेत पैसे जमा होत आहे,अतिवृष्टी नुकसान व रब्बी हंगाम अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, ”साकुर पठार भागातील उपसा सिंचन योजनेसाठी
पहिल्या टप्प्यात १४ व दुसऱ्या टप्प्यात १८ गावे जोडली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे “एकेकाळी १७० टँकर चालणाऱ्या संगमनेर तालुक्यात आज केवळ २ टँकर सुरू आहेत. दुष्काळमुक्तीचे मॉडेल म्हणून या तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे.”

डिग्रस गावाला पाणीपुरवठा अबाधित करण्याचे आश्वासन देत,“कालवा आहे, पण पाणी नाही हे चित्र मी बदलणार आहे.” मालुंजे इरेगेशन टॅंकचे पाणी डिग्रसला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उचलुन देऊ त्यासाठी १०० एच पी दाबाने सोलर पंपाने पाणी सोडले जाईल.


जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये बिबट्या प्रवण भागातील शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश दिले आहेत,ग्रामरक्षक दल स्थापन करणे, मोठ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना
करण्यासाठी ८ कोटी रुपये निधी ची तरतुद करण्यात आली आहे, ड्रोन,पिंजरे,फिरते पथक अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत,


आमदार अमोल खताळ यांनी “गावातील प्रश्न सोडविण्याचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे” असे म्हणत संगमनेरच्या माजी मंत्र्यांवर नाव न घेता टिका केली “समस्या कठीण असल्या तरी प्रामाणिक हेतू असेल तर त्या सुटतात.”४४ कोटींच्या भोजपूर चारी कामाचा शुभारंभ झाल्याची माहिती आमदार खताळ यांनी यावेळी दिली, साकुर पठार उपसा जलसिंचन सर्वेक्षणाचा प्रारंभ ही झाला आहे, “४० वर्ष काही करता आले नाही. मात्र आता निधी आम्ही आणला, तरी काही लोक केविलवाणा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.”महायुतीच्या पाठबळातून विकासकामांना गती मिळत असल्याचे नमूद केले, पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की “गट-तट विसरून मला जशी साथ दिली, तशीच साथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत द्या.” असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक नवनाथ वावरे यांनी केले, सुत्रसंचालन श्री.पुलाटे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!