नाशिक दिनकर गायकवाड ग्रामरोजगार सहाय्यक यांच्याकडून शासन निर्णय असणाऱ्या कर्तव्य आणि जबाबदारी यांचे व्यतिरीक्त असणारी बिना मोबदला अतिरीक्त कामे करून न देण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाच्या वतीने दिंडोरी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
२ मे २०११ च्या शासन निर्णयात बदल करून अर्धवेळचा पुर्णवेळ कर्मचारी म्हणून घोषीत करण्यात यावा, २००६ पासुन प्रवास भत्ता, टीए, डीए खर्च, बैठक भत्ता तात्काळ देव्यात यावा, २०२४ मार्च मधिल बाकी असलेले मानधन तात्काळ वर्ग करव्यात बावे, मागील झालेल्या या कामाचे व पुढे करण्यात येणाऱ्या कामाचे ठरखुन व मानधन देव्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी शिवाजी जाधव, समाधान शिरसाठ, युवराज गायकवाड, सोमनाथ लहांगे, भुषण चव्हाण, हिरामण झोळे, किसन धूम, विश्वनाथ चौधरी, विनोद पवार, शाम गोतरणे,उत्तम गायकवाड,प्रताप गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते..
