आश्वी संजय गायकवाड सामाजिक बांधिलकी जोपासत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कै.कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था, यांच्या वतीने येथील ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था यांना पिण्याच्या थंड पाण्याचे भांडे भेट देण्यात आले.
ह.भ.प. सुनिल पवार महाराज यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेली ही संस्था सुमारे ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना गायन, वादन, तबला,संस्कृत रामायण, महाभारत,श्रीमद्भागवत या विषयांसह धार्मिक व अध्यात्मिक शिक्षण देत आहे.संत परंपरेचे संवर्धन हेच ध्येय मानून,संत पुंजाई यांच्या नावाने आळंदी, पैठण,त्र्यंबकेश्वर,ताराहाबाद, ओझर,निधर्णेश्वर आदी पवित्र स्थळांपर्यंत पायी दिंडी सोहळे दरवर्षी आयोजित केले जातात.
या प्रवासा दरम्यान विद्यार्थी व भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या सामाजिक जाणिवेतून कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था यांच्या वतीने हे थंड पाण्याचे भांडे (जार) भेट देण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, ह.भ.प. सुनिल पवार महाराज, ह.भ.प.ज्योती पवार, मा.ग्रामपंचायत सदस्य संतोष भडकवाड,अदिनाथ जाधव, दगडु गायकवाड,बाजीराव दातीर,रमेश साबळे, इशीनाथ जाधव, गोविंद दुबे,ज्ञानेश्वर पवार, गोकुळ पवार तसेच भाविक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक जाण,अध्यात्मिक मूल्ये आणि संस्कार यांचा संगम घडवणारा हा उपक्रम सेवा,सहकार्य आणि संस्कार यांचे प्रतीक ठरला आहे.
