लोहगाव प्रतिनिधी राहाता तालुक्यातील लोहगाव येथील सुमनबाई भाऊसाहेब चेचरे (वय ६७) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती.दोन मुले.एक मुलगी.सुना, नातवंडे. नाती.जावई.असा मोठा परिवार आहे.लोहगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष भाऊसाहेब विश्राम चेचरे यांच्या तू पत्नी होत तर गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शरद भाऊसाहेब चेचरे व यशवंत भाऊसाहेब चेचरे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहात्या घराजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक विविध क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
