राहाता विशाल वाकचौरे “रक्तदान हेच जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल राहाता प्रखंड यांच्या वतीने हुतात्मा कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन दरम्यान भविष्यात प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे,या ध्येयासाठी प्राणार्पण करणाऱ्या त्या कारसेवकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशभर आयोजित होणाऱ्या या अभियानांतर्गत नुकतेच विठ्ठल लॉन्स,राहाता येथे हे शिबिर घेण्यात आले.
या रक्तदान शिबिरात तब्बल १२४ बजरंगी कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे उदात्त उदाहरण घातले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा स्वावलंबन भारत संयोजक परिमलजी वेद,संघाचे जिल्हा सेवा प्रमुख विरेश मखाना,तालुका कार्यवाहक सदानंद ताम्हाणे यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.
तसेच बजरंग दल उत्तर अहिल्यानगर जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक,विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले, विशेष संपर्क प्रमुख योगेश मखाना, बजरंग दल राहाता प्रखंड संयोजक ईश्वर टिळेकर, सहसंयोजक नवनाथ मुर्तडक, शिर्डी उपखंड संयोजक दीपक भोसले, प्रखंड सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन भवर, महाविद्यालय प्रखंड प्रमुख आकाश सुरंजे,राहाता शहर संयोजक साई पानसरे,स्वंयम मखाना, राहाता उपखंड संयोजक आकाश बावके, मनोज सुरंजे, साई गोरे,ऋषभ अग्रवाल, विकी मोरे, पशु मोरे आणि इतर बजरंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.रक्तदान शिबिरातून समाजातील युवकांना सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
