शरद दत्तू पवार या चालकाच्या गैरवर्तनाबाबत कारवाईची मागणी
संगमनेर विशाल वाकचौरे संगमनेर शहरातील हॉटेल व्यवसायिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कचरा विभागातील शरद दत्तू पवार या चालकाच्या गैरवर्तनाबाबत नुकताच लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.या तक्रारीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, नगरपरिषदेच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांकडून निर्माण होणारा कचरा संकलनाचे काम शरद पवार हा चालक करत असतो.मात्र,तो आपले कर्तव्य वेळेवर पार पाडत नसून,हॉटेल व्यावसायिकांकडून अवाजवी रकमेची मागणी करतो.तसेच पैसे न दिल्यास अरेरावीची भाषा वापरून उर्मट वर्तन करतो,असा गंभीर आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.
या गैरवर्तनामुळे सर्व हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले असून, संबंधित चालकावर योग्य ती समज देण्यात यावी किंवा त्याची बदली करण्यात यावी,अशी नम्र मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या तक्रारीवर रॉक एन रोल,आवजीनाथ पावभाजी सेंटर, निमाई स्वीट्स,नवरत्न हॉटेल, राजबक्षी हॉटेल,दोस्ती हॉटेल, ग्रेप्स फाइन डाइन आणि स्वामी समर्थ हॉटेल आदी व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हॉटेल व्यावसायिकांच्या या तक्रारीवर नगरपरिषदेने कोणती भूमिका घेते,याकडे शहरातील व्यापार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
