व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे व्हॉईस ऑफ मीडिया’चे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर झाले असून व्यंकटेश धुडूमवार,राजेश भालेराव, रमाकांत पाटील अनिल करंदकर,मंगल डोंगरे, रुपेश पाटील यांच्यासह १० जण ठरले पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सर्वांचा गौरव आहिल्यानगर  ‘व्हॉईस ऑफ मीडिया’आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार -२०२५ जाहीर झाले आहेत.
व्यंकटेश धुडूमवार,राजेश भालेराव, रमाकांत पाटील, अनिल करंदकर,मंगल डोंगरे, रुपेश पाटील यांच्यासह दहा जणांची उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे.संघटनेचे मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

जगातील ५६ देशांमध्ये कार्यरत आणि ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्य संख्या असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या जगातील क्रमांक एक पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होत आहे.

या अधिवेशनात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या निवड प्रक्रियेत प्रत्येक विभागातून एक जिल्हाध्यक्ष आणि एक तालुकाध्यक्ष यांची उत्कृष्ट कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांमध्ये व्यंकटेश धुडूमवार (गडचिरोली),राजेश भालेराव (जालना),रमाकांत पाटील (नंदुरबार),अनिल करंदकर (सातारा), मंगल डोंगरे (ठाणे), रुपेश पाटील (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. तर तालुकाध्यक्ष म्हणून राजू कापसे (रामटेक), गंगाधर ढवळे (नायगाव), उमेश काटे (अमळनेर), गणेश आवळे (मिरज) आणि भारत म्हात्रे (वसई) यांची निवड झाली आहे.

तसेच विंग स्तरावरही सन्मान जाहीर झाले असून महिला विंगमधून लक्ष्मी वाडेकर (बुलढाणा), साप्ताहिक विंगमधून जितेंद्र जोगड (चंद्रपूर), रेडिओ विंगमधून अनुप फुसके (सातारा) आणि डिजिटल विंगमधून वसंत खडसे (वाशीम) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या निवड प्रक्रियेत अजित कुंकुलोळ, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, अमोल मतकर, मिलिंद टोके, बापूराव पाटील, किशोर करंजेकर, वैशाली पाटील, रश्मी मारवाडी आणि किरण ठाकरे यांचा सहभाग होता.

संघटनेचे राज्य फादर बॉडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,महासचिव दिगंबर महाले,कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक,महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इर्षाद शेख, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!