नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात इसमांनी दोन मुलींना कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
अपहरणाचा पहिला प्रकार कॉलेज रोड येथे घडला. फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरवायके महाविद्यालयाच्या गेटवर परीक्षेसाठी सोडले. त्यानंतर आरोपी आदित्य बाळासाहेब ननावरे (रा. बालभारतीमागे, लेखानगर, सिडको) याने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कहांडळ करीत आहेत.
अपहरणाचा दुसरा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. फिर्यादी हे पाथर्डी फाटा परिसरात यशवंतनगरमध्ये राहतात. दि. १७ नोव्हेंबर रोजी त्यांची बहीण घरी होती. अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी
इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
