.
नाशिक दिनकर गायकवाड घराच्या पोर्चमध्ये उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शिंदे गाव येथे घडली.
राहुल कचरू जाधव (रा. मारुती मंदिराजवळ, शिंदे गाव, ता. जि. नाशिक) यांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंजाबाबा चौक येथे शांताराम झाडे यांच्या घराच्या पोर्चमध्ये एमएच १५ एफएच ८४४० या क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची मेस्ट्रो मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
