त्या थराराचा अंत नाही;ग्रामस्थांना गाफिल न राहण्याचे नाही
झरेकाठी सोमनाथ डोळे मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील शेडगाव आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे.तीन दिवसांत एकापाठोपाठ एक असे तीन बिबट्ये पिंजऱ्यात अडकल्याने गावकऱ्यांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शेडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार वाढला होता.शेतकरी,शेतमजूर,महिला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये यामुळे मोठी घबराट पसरली होती. शेतात पाणी भरण्यासाठी जाणे किंवा दिवसा एकटे फिरणेही कठीण झाले होते.या पार्श्वभूमीवर वनविभागाने शिवाजी संता सांगळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसांत तीन बिबट्ये जेरबंद झाले आहेत.अशी माहिती भाऊसाहेब मारुती नागरे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी यांचं परिसरात चिमुकल्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता.या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.सुदैवाने या हल्ल्यातून तो बचावला,पण या घटनेनंतर गावात मात्र मोठी दहशत युक्त भिती निर्माण झाली.जी अद्यापही कायम आहे.
जरी तीन बिबट्ये जेरबंद झाले असले,तरी संकट पूर्णपणे टळलेले नाही,अशी भीती व्यक्त केली जात आहे.परिसरात आणखी बिबट्ये किंवा त्यांची पिल्ले असण्याची दाट शक्यता स्थानिक नागरीकानी वर्तवली आहे.तर,वनविभागाने ही मोहीम थांबवली नसून,गस्त आहे
