नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाच रात्री बासरू व मेंढी ठार झाली असून एक मेंढी जखमी झाल्याची घटना घडली.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
रात्रीच्या सुमारास बिबट्याने संपत दिनकर गांगुर्डे या शेतक-याच्या गोठचात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने घरातील माणसं जागी होऊन आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाल्याने वासरू मरण पावले होते. दुसऱ्या घटनेत साक्री तालुक्यातून आपल्या शेकडो मेंढ्यांसह कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी स्थलांतरित झालेल्या व म्हेळुस्के येथे ओझे
म्हेलुरुके रस्त्याच्या शेजारी असलेल्या निर्जन ठिकाणी बास्तव्यास असलेल्या दशरथ कोडू वाकसे यांच्या दोन मेंढ्यांवर बिबट्याने अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हल्ला केल्याने एक मेंढी जागेवर ठार झाली तर दुसरी मेंढी गंभीररीत्या जखमी झाली आहे. मेंढ्यांच्या ओरडण्याने जवळच झोपलेल्या धनगर बांधवांना जाग आल्याने घडलेली घटना त्यांना समजली. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाच्या
व पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकंती करत फिरणाऱ्या धनगर बांधवांच्या पशुधनाची बिबट्याच्या हल्ल्यात बारंबार होणारी हनी बघून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या दोन चार वर्षापासून म्हेळुस्के गाव व परिसरात बिबट्याचे रात्रीसह दिवसाही वेळोवेळी दर्शन होत असल्याने मजूर वर्ग मजुरी करण्यासाठी धास्तावलेला आहे. परिसरातील कुत्रे व शेळ्यांवर हल्ले होत असल्याने अशा घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्याच महिन्यात मेधने वस्तीवर एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. घडलेल्या दोन्ही घटनेचा वनविभागाने पंचनामा केला असून लवकरात लवकर संबंधित ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
