गैर कायद्याची मंडळी जमवुन आरोपीच्या पत्नीचा पोलिस ठाण्यात धिंगाणा

Cityline Media
0
नाशिक दिनकर दाखल गुन्ह्यातील अटकेतील आरोपीला गुन्हे शाखा युनिट १ च्या कार्यालयात आणून चौकशी करीत असताना आरोपीच्या पत्नीसह तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
याबाबत पोलीस शिपाई शांताराम गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी हे कर्तव्यावर असताना उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कैलास बाबूराव मैंद याला

पोलिसांनी अधिक तपासासाठी युनिट-१ च्या कार्यालयात आणले होते. त्यावेळी तपास चालू असताना आरोपी सारिका सुभाष पवार ऊर्फ सारिका कैलास मैंद (रा. हरिविहार सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) या महिलेने गैरकायद्याची मंडळी जमवून कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र फिर्यादीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा सारिका मैंद यांना राग आला. या महिलेने तिचे सहकारी प्रशांत श्रीकृष्ण गारमोरे (रा.वृंदावन गार्डन,जेलरोड), दीपक दत्तू किडवई (रा. वीर सावरकरनगर,

जेलरोड), रवी जाधव, अजय पाटील, नितीन परदेशी, देवा शिसोदे व इतरांनी फिर्यादीला धक्का देऊन महिला पोलीस कर्मचा-याची गच्ची पकडून शिवीगाळ केली, तसेच आरोपी कैलास मैंदला सोडले नाही, तर आत्महत्या करण्याची, तसेच गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला.या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सारिका मैंदसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाप करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!