बिबट्याच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना उपचारांबरोबर आर्थिक मदत द्यावी-श्रीकांत भालेराव

Cityline Media
0
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेची भेट घेत कुटुंबियांना धीर दिला 

संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवरील अर्चना संदीप टेमगिरे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.अर्चना  टेमगिरे यांनी बिबट्याशी चिवट झुंज देऊन त्याचा हल्ला परत लावला.दोन ते तीन वेळेस बिबट्याला हाताने पाठीमागे लोटून दिले.त्यामुळे बिबट्या खाली पडला शेतात तारा असल्यामुळे बिबट्याचा प्रतिकार कमी पडला.आणि आपला स्वतःचा बचाव करण्यात अर्चना टेमगिरे यशस्वी झाल्या.

घटनेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर शहरातील कुटे हॉस्पिटल मध्ये अनेक दिवस उपचार सुरू होते.सदर घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी हिवरगाव पावसा टेमगिरे वस्ती येथे भेट दिली.आणि जखमी अर्चना टेमगिरे यांच्या तब्येतीची चौकशी करत कुटुंबियांना धीर दिला.
वनविभागाने औषध उपचाराचा खर्च केला आहे परंतु त्या मानसिक दृष्ट्या हादरलेल्या आहेत.त्यांना पुढे अनेक दिवस औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.अशा परिस्थितीत वनविभाग व महाराष्ट्र शासनाने हल्यात गंभीर जखमी व्यक्तींना औषध उपचारा बरोबर आर्थिक मदतही त्यांनी गरजेचे आहे असे श्री.भालेराव यांनी माध्यमांसमोर सांगितले.

यावेळी त्यांनी यांनी महाराष्ट्र शासन व वन विभाग तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे व्यक्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी व्यक्तींना औषध उपचाराबरोबर आर्थिक मदत तात्काळ करण्याची मागणी केली आहे.

हिवरगाव पावसा पंचक्रोशीत बिबट्याची शोध मोहीम हाती घेऊन येथील परिसर बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी वन विभागाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.प्रसंगी कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,
बाळासाहेब टेमगिरे,संदीप टेंमगिरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!