दाढ खुर्द किशोर वाघमारे शिवसेना शिंदे गट अनुसूचित जाती विभाग अहिल्यानगर जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या बोटा येथील तालुका संगमनेर स्थित उच्चशिक्षित पूजा सोनवणे यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे अनुसूचित जातीचे प्रदेश प्रमुख पक्षाचे मुख्य सहप्रवक्ते उपनेते डॉ.राजू वाघमारे यांच्या आदेशाने अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे तसेच अनुसूचित जाती विभाग अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी नुकतीच संगमनेर येथे झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
संगमनेर येथे मालपाणी लॉन्स येथे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देत महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी पूजा सोनवणे यांची निवड करण्यात आली.
पूजा सोनवणे यांनी शिवसेना पक्ष पुर्व रिपब्लिकन पक्षासह अन्य पक्षांमध्ये जिल्हाप्रमुख पदासह महत्त्वाच्या पदावर काम केले असून संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर मध्ये त्यांचे महिलांचे मोठे संघटना असून त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन केले आहे.
पुजा सोनवणे यांनी गेली दोन वर्षांपासून मुंबई येथे पक्षाचे पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे डॉ.राजू वाघमारे किशोर वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो महिला घेऊन बाळासाहेब ठाकरे भवन येथे जल्लोषात प्रवेश केला होता.
सोनवणे यांच्या कामाची व कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी त्यांना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्त केले असून यापुढील काळामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी व शिवसेना
पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गरीब घटकातील माणसाच्या उन्नतीसाठी राबवण्यात व शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करावे अशा शुभेच्छा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे व डॉ.राजू वाघमारे यांनी त्यांना दिला असून पूजा सोनवणे या उच्चशिक्षित असून त्या वकिली व्यवसाय करत असून बचत गटाचे मोठे संघटन पठार भागामध्ये बोटा घारगाव परिसरात केले.
त्यांचा शिवसेना पक्ष वाढीसाठी उपयोग होणार आहे व एक चांगला नेतृत्व पक्षाला मिळाला असल्याचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले असून याप्रसंगी अहिल्यानगरचे अनुसूचित जाती शहर प्रमुख विनोद साळवे संगमनेर तालुकाप्रमुख गौतम रोहम महिला आघाडी प्रमुख रायते गावच्या सरपंच रूपाली रोहम महिला आघाडी संगमनेर शहर प्रमुख रूपाली वाघमारे राहाता तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे शिर्डी शहर प्रमुख उत्तम त्रिभुवन सतीश अभंग उपतालुकाप्रमुख पप्पू मोकळ गोरख बनसोडे सुनील बनसोडे शरद भालेराव आधी प्रमुख शिवसैनिकासह अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने मालपाणी लॉन्स येथे उपस्थित होते
