नाशिक दिनकर गायकवाड
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार असलेले भात पीक शेतातब भिजल्याने मळणी व झोडणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी काफ्लेला भात वाळवण्यासाठी ठेवला असताना अचानक आलेल्या पावसामुळे तो पूर्णपणे ओला झाला आहे. काही ठिकाणी भाताच्या गाठी पाण्यात बुडाल्याचे दिसून येत असून पीक कुजण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने तातडीने मदत करावी,अशी मागणी भाजप हरसूल मंडळाचे सरचिटणीस अशोक भोय,सामाजिक कार्यकर्ते मनोज बाजे कनसरी माता शेतकरी गटाचे उपाध्यक्ष लहूदास दाहबाड यांनी केली आहे.
