नाशिक दिनकर गायकवाड कायद्याने अस्पृश्यता नष्ट झाली तरी जात्यांध आणि धर्मान्ध मानसिकतेच्या डोक्यातून ती जात नाही चांदवड तालुक्यातील दुगाव येथे पन्नास ते साठ वर्ष आपले घर बांधून राहणारे वडार समाजातील भगवान सोमा शिंदे,ज्ञानेश्वर सोमा शिंदे यांच्या घरामागे सरपंच संजय पुंडलिक सोनवणे यांची शेती आहे शिंदे परिवाराने आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी स्वंतत्र पाण्याचा बोर घेतला मग खुन्नस म्हणून सरपंचाचे ग्रामसेवक अजय आव्हाड यांना हाताशी धरून अतिक्रमणचे कारण दाखवून शिंदे यांचे चार पक्के घरकुले जेसीबीने उध्वस्त केले.
पिडीत शिंदे यांनी आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून महसूल आयुक्त यांना दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की आम्ही वडिलोपार्जित जागेत मी व माझे कुंटुंब त्या जागेत रात होतो.मला व माझ्या कुटुंबात एकुण आठ 'घरकुल' मंजूर झाले होते म्हणून मी व माझ्या कुंटुंबातील सदस्यांनी एकत्रच घर बांधू असे ठरविले होते.
मी व कुटुंब सदस्य यांनी नुकतेच या घराचे बांधकाम सुरु होते होते.प्रतिज्ञापत्र तयार करून हे प्रमाणपत्र चांदवड पंचायत समिती येथे घेवून गेलो परंतु तेथे ग्रामसेवक व सरपंच हजर होते त्यांनी जात्यांध शब्दांचा उच्चार करून स्वाक्षरी करण्यास नकार दिला.
घरकुल अनुदान १५००० रुपये आले होते मी भटक्या (विमुक्त) जमातीचा असल्याने माझ्यावर सरपंच आणि ग्रामसेवक जातीय द्वेषातून अन्याय करून मी व माझे कुंटुंब बांधत असलेच्या उभे पक्के घर बुलडोझरच्या साहय्याने उद्ध्वस्त करून मला व माझ्या एकूण २७ लेकांना बेघर केले काम आहे.
मी वारंवार जिल्हा परिषद नाशिक,पंचायत समिती चांदवड व ग्रामसेवक दुगाव सर्वांना वेळोवेळी भेटुन व पुरावे दाखवूनही माझे घर उध्वस्त अवस्थेत ठेवले व आठ मंजूर घरकुलापैकी चार घरकुल शिल्लक ठेवून नियमबाह्य सात घरकुल रद्द केले आहे
परंतु आज पर्यंत मला न्याय देण्यात अलेला नाही म्हणून न्याय मिळवण्यामागी मी १० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु उरणार आहे आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका उत्पन्न झाल्यास त्याम दुगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक,सरपंच जवाबदार राहतील
निवेदनावर भगवान सोमा शिंदे ज्ञानेश्वर सोमा शिंदे यांच्या सह्या आहेत.
या मागणी निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परीषद, नाशिकपोलीस आयुक्त पोलीस आयुका कार्यालय नाशिक,गट विकास अधिकारी-पंचायत समिती चांदवड पोलीस निरीक्षक नाशिकरोड पोलीस ठाणे ग्रामसेवक दुगाव ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत.
