नाशिक प्नतिनिधी शहरातील रावसाहेब थोरात सभागृह येथे नुकतेच नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ शिक्षण मंत्री दादा भुसे उत्साहात पार पडला.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.त्यानुसार सन २०२५–२६ साठी ७ शिक्षक व ५ मुख्याध्यापक,असे एकूण १२ शिक्षकांची ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली.
निवड झालेल्या शिक्षकांमध्ये सौ.उज्वला कोठुळे, सौ.अनुराधा बस्ते,सय्यद उजमा, लक्ष्मण सानप, सौ.निर्मला गायकवाड,विक्रम नागरे,भास्कर साळवे,शांताराम देवरे,सौ.प्रमिला देवरे,अन्सारी हमिदा,भास्कर कुळधर आणि सौ.अनिता जाधव -या मान्यवर आदर्श शिक्षकांचा समावेश आहे.
प्रसंगी सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.त्यांच्या कार्याचा गौरव करताना,हा पुरस्कार अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मागील वर्षी नाशिकमध्ये गुरमीत सिंग बग्गा यांनी आयोजित केलेल्या ‘झेप’ या सामूहिक गायन कार्यक्रमात ३१ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
