वरवंडीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी नुकतेच शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की वरवंडी गावातील ज्युनिअर के.जी.चे विद्यार्थी शिकण्यासाठी पानोडी शिबलापूर आदी ठिकाणी जातात हे विद्यार्थी बसने प्रवास करतात चिमुकल्या जीवांचा प्रवास थांबावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी येथे ज्युनिअर के.जी.वर्ग सुरू करण्याचा निर्णय शाळेने बैठकीत घेतला आहे.
या निर्णयाचे गावातून सर्व ग्रामस्थ कौतुक करत आहे.शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले असे आपण म्हणतो यालाच छेद देत वरवंडी गावातील शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय गावातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे.
प्रामुख्याने गावांमध्ये इंग्लिश मीडियम नसल्या कारणाने गावातील अनेक लहान मुले जे के.जी. मध्ये शिकणारे शिबलापूर किंवा पानोडीसह इतर गावांना बसने प्रवास करून शिकतात.याच विद्यार्थ्यांसाठी वरवंडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ज्युनिअर केजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये झाला.
गावातील शिक्षित तरुण,तरुणी यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन हे शिक्षण देणार आहेत गावांमध्ये ज्युनिअर के.जी.चा वर्ग चालवला जाणार आहे तरी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील सर्व नागरिक व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या पाल्यांना आता कोठेही बाहेर शाळेत घालण्याची गरज नाही आपण आपल्या पाल्याला आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाठवून द्यावे असे यावेळी आवाहन यावेळी बैठकीतून करण्यात आले यामुळे पालकांचा वार्षिक खर्च व मुलांमध्ये प्रचंड तणाव होत असतो तो देखील कमी होणार आहे.
वरवंडी गावामध्ये प्रामुख्याने शेतकरी आहेत याचा प्रमुख हेतू हा आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आपल्या गावातच मिळावे व आर्थिक ताण शेतकऱ्यांवर त्यांच्यावर पडू नये मुलांसाठी शिक्षण सोयीचे व्हावे.
