एक सराईत गुन्हेगार अटक
श्रीरामपुर दिपक कदम दिवसेंदिवस गुन्हेगारीचे आगार बनू इच्छिणाऱ्या श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्र विक्रीवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांकडून दोन विदेशी बनावटीच्या गावठी पिस्तुलांसह तीन जिवंत काडतुसे जप्त केली.
बालकांनी दिलेल्या माहितीनुसार,ही शस्त्रे विक्रीसाठी शादाब जावेद शेख (वय २८,रा. वेस्टन चौक,श्रीरामपुर) याने दिली असल्याचे उघड झाले.पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. एकूण दोन पिस्तुले,तीन काडतुसे,तीन मोबाईल व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहेत.
या प्रकरणात श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शादाब शेखला अटक केली आहे. त्याच्या विरोधात वाढीव कलमे लावून पुढील तपास सुरू आहे. त्याने शस्त्रे कुठून आणली व कोणाला विक्री करणार होते याचा तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपुर, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे,संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे,सहदेव चव्हाण, अशोक गाढे,सतिष पठारे, नितीन शेलार,संतोष दरेकर, सचिन धनाड,रामेश्वर वेताळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
