नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील बोरोली येथे झालेल्या प्रगतशील साहित्य संमेलनात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उद्योन्मुख कवी कृष्णा राऊत यांना त्यांच्या प्रभावी सर्जनशील लेखनासाठी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद अहिरे तसेच नामवंत साहित्यिकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृष्णा राऊत यांच्या सन्मानाबद्दल साहित्यप्रेमी,कवी आणि वाचकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कवी कृष्णा राऊत यांच्या कवितांमध्ये आदिवासी समुदाय तसेच ग्रामीण जीवन, सामाजिक विषमता आणि बदलत्या समाजव्यवस्थेतील माणसाचे वास्तवतेशी असलेले नाते ठळकपणे दिसते. 'अंधभक्त' या कवितेत त्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे जिवंत वप्रखर चित्रण केले आहे.
