नाशिक दिनकर गायकवाड पेठ तालुक्यातील माळेगांव येथे शिवसेनेची बैठक उत्साहात पार पडली. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीत विविध सामाजिक, विकासात्मक तसेच संघटनात्मक मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. आंबे गटातील सुख सुविधा वाढविणे, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, आणि इतर शासकीय योजनांचा
लाभ गावागावात पोहोचविणे याबाबत चर्चा करण्यात आली. मा.सरपंच प्रल्हाद गायकवाड, उपसरपंच प्रकाश राऊत, जोगमोडी सरपंच हेमराज राऊत यांनी स्थानिक प्रश्न मांडले, यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, माजी सभापती भास्कर गावित, शाम गावित, पद्माकर कामडी, राधाचाई राऊत, दिलीप भोये,धर्मराज चौधरी, गोपाळ देशमुख, शहानवाज हुसेन, रोहिदास राऊत, अनिल पवार, भीमराव भोये,अंबक कामडी,राजेंद्र ठाकरे,अशोक गवळी आदी उपस्थित होते.
