आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा तीव्र करणार

Cityline Media
0
आदिवासी बचाव समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

झरेकाठी सोमनाथ डोळे आदिवासी बचाव समिती आदिवासींच्या न्याय कशासाठी लढा देण्यासाठी तयार करण्यात आली असून आदिवासींचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच समिती अहोरात्र झटणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री क्षेत्र देवगड येथे झालेल्या समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख भिल्ल समाजाच्या नेत्यांनी हाजरी लावली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासींचे प्रखर नेतृत्व कैलास माळी होते प्रमुख उपस्थितीमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवाजी गांगुर्डे व आदिवासींचे निर्भीड नेते ज्ञानेश्वर अहिरे उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील अनेक आदिवासी ‌मातब्बर नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी आदिवासी नेत्यांनी आपली मते मांडताना आदिवासींचा विकास डोळ्यासमोर ठेवून आदिवासी हिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले.प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारे बैठका घेऊन प्रमुख आदिवासी कार्यकर्त्यांची वज्रमुठ बांधण्यात येणार आहे व त्यातून संपूर्ण राज्यात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी खूप मोठा लढा उभा केला जाणार आहे.

यावेळी बोलताना कैलास माळी म्हणाले की,
आदिवासींच्या हक्काचा निधी इतरत्र वळवला जातो आणि आदिवासींच्या तोंडाला मात्र पाणे  पुसली जातात तसेच आदिवासींचे आरक्षण  फिरते ठेवण्यात यावे यासाठी पाठपुरावा करू‌ व प्रस्थापितांच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण जी वज्रमुठ बांधली आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातील आदिवासी एकत्र करू असे या वेळी ते म्हणाले .

शिवाजी गांगुर्डे म्हणाले आदिवासींची अनेक कामे अडकून पडली आहेत. शासकीय दरबारी जाणीवपूर्वक आदिवासींना डावलले जाते. आदिवासीं मधील घुसखोरी व फिरते राजकीय आरक्षण आदिवासींना मिळावे यासाठी समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे असे सुतोवाच यावेळी त्यांनी केले.

यावेळी आदिवासींचे निर्भीड नेते ज्ञानेश्वर अहिरे यांनी आपल्या खास शैलीत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. ज्ञानेश्वर अहिरे म्हणाले की, सध्याचे सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे. आदिवासींवर अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

या समितीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की यापुढील काळात आदिवासींवर जो कोणी अन्याय करेल त्याला आता माफी नाही तसेच ‌या पुढील काळात श्रीक्षेत्र पिंपळदरी येथील येडू मातेच्या यात्रेसाठी चार दिवस जागा अरक्षित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे.

यापुढे जो आदिवासींना आडवा येईल त्याला त्याच ठिकाणी आडवा केला जाईल असा खणखणीत इशारा यावेळी श्री.अहिरे  यांनी दिला.यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी नेत्यांनी आदिवासी बचाव समिती स्थापन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

बैठकीला ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे,कैलास माळी, रघुनाथ आहेर,सुभाष पवार, नवनाथ माळी,अनिल बर्डे ,नवनाथ शिंदे,भगवान बर्डे, अशोक पवार, सौ.अंजली पवार, सौ. तारा अहिरे,चंद्रकांत बर्डे, नारायण बर्डे, शिवाजी जाधव, सोना चिंधे, सुदाम मोरे,अनिल पवार, बाबासाहेब पवार,युवराज माळी, भगवान पवार,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!