जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणुकीत रिपाई गवई पक्ष काँग्रेस मित्र पक्षासोबत-सुधाकर रोहम

Cityline Media
0
संगमनेर किशोर वाघमारे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्ष काँग्रेस मित्रपक्ष महाविकास आघाडी सोबत युती झाली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम यांनी संगमनेर येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली.
यावेळी ही घोषणा करताना रोहम यांनी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व मा.विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांची मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालय मध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली.

बैठकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रामराव दाभाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपालिका यामध्ये आमचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अधिकृत काँग्रेस पक्षाची युती असून महाविकास आघाडी सोबत आमच्या पक्ष अधिकृत असल्याने काँग्रेस पक्षाने आमच्या पक्षप्रमुख डॉ.राजेंद्र गवई यांचा फोटो जाहीर नाम्यात प्रसिद्ध करून रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत असणारा निळा झेंडा प्रचार यंत्रणेत वापरून सर्व जिल्हाप्रमुखांना व तालुकाप्रमुखांना शहर प्रमुखांना महिला आघाडी प्रमुखांना विश्वासात घेऊन प्रचारयंत्रणेत सहभागी करून घ्यावे.

रिपाइं गवई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत संगमनेर येथील बैठकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश देठे राजेंद्र घायवट अशोक गायकवाड श्री.गायकवाड संगमनेर तालुकाप्रमुख ॲड रमेश बनसोडे गोरख बनसोडे जालिंदर बोरुडे सुनील बनसोडे सोमनाथ खरात बाळासाहेब गायकवाड दादू यादव साहेबराव यादव ज्येष्ठ नेते बन्सी भाऊ घंगाळे उत्तम साळवे अशोक शिंदे उत्तम कडलक आदी मान्यवर सह भीमसैनिक रिपाई गवई पक्षाचे पदाधिकारी संगमनेर येथे हॉटेल अंबर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या पक्षाची अधिकृत काँग्रेस व विकास आघाडीची युती असून सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस महाविकास आघाडी पक्षाचे काम करावे जे पदाधिकारी पक्ष विरोधी काम करतील त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा सुधाकर रोहम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

काँग्रेस महाविकास आघाडीने आगामी काळामध्ये सत्ता आणायचे असेल तर आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आमचे पक्षप्रमुख डॉ.राजेंद्र गवई यांचे योग्य ते राजकीय पुनर्वसन करावे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आम्ही ज्यांच्या सोबत असतो त्या पक्षाची सत्ता महाराष्ट्र राज्याचे अहिल्यानगर जिल्ह्यात असते आमची युती तुटल्यामुळे आपल्या पक्षाशी सत्ता गेली याची काँग्रेस पदाधिकारी भान ठेवावी व पुन्हा एकदा कामाला लागावे असे आवाहन सुधाकर यांनी केले उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार संगमनेर तालुकाप्रमुख ॲड.रमेश बनसोडे यांनी मांडले

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!