नाशिक दिनकर गायकवाड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रा.राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र आणि ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन दृश्यमानता, नैतिक प्रकाशन आणि संशोधनात ए. आय. साधनांचा वापर या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यभरातील ९१ - संशोधक विद्यार्थ्यांनी या -कार्यशाळेत सहभाग घेतला.
विद्यापीठाच्या यश इन - सभागृहात झालेल्या कार्यशाळा समारोप कार्यक्र माच्या - अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. - व्यासपीठावर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व केंद्रीय विद्यापीठ, हरियाणाचे ग्रंथपाल प्रा. संतोष सी. - एच., विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या तथा प्रा. राम ताकवले, - संशोधन व विकसन केंद्राच्या प्रमुख प्रा. डॉ. संजीवनी महाले, विद्यापीठ - ज्ञानस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश - बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी संशोधन - लिखाणात संशोधकाने नैतिकता - तर पाळलीच पाहिजे; परंतु त्यात त्याचा स्वतःचा एक वेगळा बाणा दिसला पाहिजे.
त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे न्याय स्पष्टीकरण त्यास देता आले पाहिजे.एआय आणि तंत्रज्ञानाच्या या युगात बाह्यप्रेरणेपेक्षा स्वयंप्रेरणेने काम करत संशोधकाने आपल्या संशोधनातील ज्ञान कालबाह्य होण्याच्या आत संशोधन कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहनदेखील त्यांनी शेवटी केले.
विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातील संगणक प्रयोगशाळेत सहभागी संशोधकांना सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. त्यात प्रामुख्याने प्रभावी ऑनलाईन शोध तंत्र आणि धोरणे, संशोधन आणि प्रकाशन कार्यांसाठी एआय साधने आणि मुक्त प्रवेश संसाधने, नीती, नियमांसंदर्भात साहित्यिक चोरी टाळणे, प्रीडेटरी नियतकालिकांची ओळखः उपयुक्त साधने, मानके व तंत्रे, उद्धरण मेट्रिक्सः इम्पॅक्ट फॅक्टर, आय १० इंडेक्स, आय २० इंडेक्स, अल्टमेट्रिक्स या विषयांवर प्रात्यक्षिक आधारित व्याख्यान देण्यात आले. या सत्रांसोबतच 'उपयुक्त सूचना, चर्चा व कार्यशाळेनंतरचे असाइनमेंट्स' यावरही मार्गदर्शन करण्यात आले.समारोप प्रसंगी सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे
वितरित करण्यात आली. डॉ. भागवत कराडकर, संदीप किजवे व शुभांगी पाटील या सहभागी संशोधकांनी कार्यशाळेबद्दल मनोगत व्यक्त केले.डॉ. वसुदेव राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेच्या आयोजनात डॉ. सचिन पोरे व राधिका शिंदे यांनी योगदान दिले.राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.
