दिंडोरी तहसीलदारांना राष्ट्रवादीचे निवेदन
नाशिक दिनकर गायकवाड मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे झालेल्या घटने संदर्भात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष तौसिफ मनियार यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्या कार्यालयातील नायब तहसिलदार श्रीमती मंदाकिनी काथेपुरी यांना नुकतेच निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामदास आण्णा पिंगळे युवक शहराध्यक्ष सागर गुंबाडे का.सा.का उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते संचालक मधुकर आण्णा गटकळ रावसाहेब पाटील रघुभाऊ जाधव गुलाब गांगोडे केशव भुसारे रणजित परदेशी आदी उपस्थित होते.आरोपीला फाशीची शिक्षाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
