भोजापूर डावा कालवा आणि पुर चारीसाठी ४४ कोटी मंजूर निधी कामांचा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
झरेकाठी सोमनाथ डोळे भोजापूरच्या लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या ११ गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.भोजापूर प्रकल्पाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करून अतिरीक्त पाणी निर्माण करण्यासाठी आरखडा तयार करण्यात असून जिरायती भागात सिंचन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी दिली.
भोजापूर डावा कलवा आणि पूर चारीच्या कामासाठी मजूर झालेल्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमास अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने बाळासाहेब शेटे जलसंधारण विभागाचे हरीभाऊ गीते कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे तहसिलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी प्रविण सिनारे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,चाळीस वर्षात जे झाले नाही ते एक वर्षात महायुती सरकारने करून दाखवले.आ.अमोल खताळ आणि डॉ सुजय विखे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीपुर्वी भोजापूरचे पाणी देण्याचा शब्द आपण दिला होता.यापुर्वी सारखे टॅकरने पाणी आणून टाकण्याची वेळ आली नाही कोणत्याही कार्यकर्त्याचे जेसीबी वापरून सहकारी संस्थामधून बील काढावी लागली नाहीत असा टोला लगावून मंत्री विखे म्हणाले की,यापुर्वी निळवंडे आणि आता भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून दिले.यंदा पाऊस चांगला झाल्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देता आल.
परंतू या भागातील ११गावे अशी आहेत की त्यांना निळवंडे आणि भोजापूरच्या पाण्यापासून वंचित राहीलेल्या सोनेवाडी पिंपळे सोनोशी नान्नज दुमाला काकडवाडी पारेगाव खुर्द आणि बुद्रुक गावांना पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.निळवंडेच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून काही गावांची मागणी असून उपसा सिंचन योजना राबवून पाणी देता येईल का यासाठी अधिकाऱ्यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विशेष म्हणजे भोजापूर प्रकल्पाचा समावेश आता दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये करण्यात आला असून यासाठी १२ते १३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे.स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी जे स्वप्न पाहीले होते ते पूर्ण करण्याचे काम सुरू झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आमदार अमोल खताळ आपल्या भाषणात म्हणाले की यापूर्वी निवडणूक आल्या की भोजपुरी चारी आठवायची मात्र मंत्री विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा जबाबदारी आल्यानंतर पाण्याचा दिलासा या भागाला मिळाला यापूर्वीचारीचे काम फक्त बगलबच्चे पोहोचण्यासाठी होत होते. चाळीस वर्ष प्रलंबित राहिलेला प्रकल्प आपण आमदार झाल्यानंतर एका वर्षात मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तळेगाव निमोण प्रामाणिक साकुर वाटर भागातील पाण्याचा प्रश्न उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सोडवला जाणारा असून, तालुक्यात फक्त निधी आणण्याचे फोटो दाखवून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे .या भागातील जगदंबा माता मंदिरासाठी खरच निधी आणला का? ही देवीच्या मंदिरात येऊन सांगावे असे आव्हान त्यांनी दिले.
समनापुर जिल्हा परिषद,गटातल्या जनतेतल्या मनातला उमेदवार सौ.कविता कैलास पाटील ह्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर न बसता जनतेमध्ये बसल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले.कार्यक्रमास किसन चतर ,सुदाम सानप, भीमराज चतर ,श्रीकांत गोमासे, कविता पाटील सामनापूर गटातल्या जिल्हा परिषद गटातल्या जनतेच्या मनातल्या उमेदवार कारखान्याचे संचालक विजय म्हसे,जनसेवा युवा मंच सदस्य,भाजप बूथप्रमुख झरेकाठी सोमनाथ डोळे,हरीष चकोर संदीप देशमुख,विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे ,किशोर वाघमारे,आदीसह लाभक्षेत्रातील शेतकरी महीला उपस्थित होत्या.
