नाशिक दिनकर गायकवाड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.
मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पंडित नेहरू यांच्याविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर
शिंदे यांनी केले.यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील,विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार,जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांच्यासह विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, शैक्षणिक संयोजक विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
