पावसाच्या संकटांने नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भाजीपाला सडला

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष कडू झाले असून कांद्या पाठोपाठ टोमॅटो आणि द्राक्षालाही फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दिंडोरी तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक चालू होताच सतत दमदार हजेरी लाबल्याने चालू झालेले पिके पूर्णतःखराब झाली. त्याच काळात सर्वत्र द्राक्षाची छाटणी सुरू असल्याने पावसाचा परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा ह्या पोंगा अवस्थेतून पास होऊन माल बाहेर पडण्याऐवजी अकच्या काही तासात घड जिरुन फेल झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.चालू वर्षी जिल्ह्यासह जवळपास संपूर्ण राज्यभर उन्हाळ्यापासून सतत दमदार पाऊस पडत राहिला आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या उन्हाळी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कारले, दोडका, भोपळा, काकडी, वांगे, शिमला मिर्ची हे सर्व पिके खराब झाली होती. त्यावेळी परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या होत्या, परंतु त्या सुद्धा अवकाळी पावसाने खराब होऊन केलेली पद्‌मोड परत मिळणे मुश्किल झाले होते. ते संकट शेतकरी विसरतो न विसरतो तोच टिकाऊ आणि साठवणूक करण्यायोग्य आणि नियतक्षम नगदी मानले जाणारे कांद्याचे विक्रमी पीक दिंडोरी, कळवण, देवळा, सठणा, चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर व इतरही तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले होते. तेही एक ते दिड महिना अगोदरच पडलेल्या अवकाळी पावसात सापडून शेतात सडा

पडल्याचे दिसत होते. तिथेही शेतकऱ्यांनी जवळ असलेले चार पैसे कमी पडल्यामुळे बँकाकडून सोने तारण कर्ज आणि काही पीक कर्ज घेऊन केलेल पीक भांडवल सुद्धा न देता जमिनीतच सडल्याचे शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले होते. त्यानंतर आर्थिक गणित संपूर्ण कोलमडले असतांना देखील शेतकऱ्यांनी पुन्हा पावसाळ्यात पीक टिकून राहावे म्हणुन आधुनिक शेतीचा अवलंब

करून वांग्याच्या काडीवर कलम केलेल्या टोमॅटो रोपास पसंती देऊन सरासरी खचपिक्षा आठ दहा पटीने वाढणाऱ्या प्रत्येकी दहा रुपये प्रति काडी इतक्या महागाची रोपे घेवुन टोमॅटोच्या लागवडी केल्या होत्या. त्या सुद्धा परतीच्या पावसानंतर पडलेल्या पावसात पुर्ण खराब झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च केलेले भांडवल निघणे अवघड असल्याचे शेतकरी बोलत

आहेत. शेवटचे राहीलेले द्राक्ष पीकसुद्धा वर्षभर प्रचंड खर्च करून छाटणी नंतर ऐनवेळी स्वप्नांचा चक्काचूर होऊन गेल्याने द्राक्ष बागायतदार हतबल होऊन चिंताग्रस्त झाला आहे. याचा परीणाम पुढील चार वर्ष भोगावा लागणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले. सुरुवातीला उन्हाळी टोमॅटोचा पंचनामा नंतर कांद्याचा पंचनामा त्यानंतर नागपंचमीच्या लागवडीचा पंचनामा आणि शिल्लक राहिलेले द्राक्षबाग आता त्याचाही शेवटी पंचनामाच असे वर्षभर फक्त रात्रदिवस कष्ट आणि कर्ज करून केलेल्या पिकांचे फक्त पंचनामेच करीत आलो आता नुकसान किती सहन करायचे?अशा प्रकारच्या हृदयद्रावक भावना शेतकरी व्यक्त करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!