अपघातानंतर मुलाच्या आठवणी जोपासण्यासाठी आई-वडीलांनी केले आंबा झाडांचे वृक्षारोपण

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सोनवणे कुटुंबातील प्रसाद प्रकाश सोनवणे या तरुणाचे सहा वर्षापुर्वी अपघाती निधन झाले होते.सजग सोनवणे कुटुंबांने नागरीकाना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला व आपल्या तरुण मुलाच्या आठवणी जोपासण्याचे अनोखे कार्य करत समाजप्रबोधनाचा एक आदर्श निर्माण केला आहे.आणि आपल्या मातीची कृतज्ञता व्यक्त केली.
आश्वी खुर्द जि.प.प्राथमिक शाळेत  दिवंगत प्रसाद सोनवणे यांच्या पुण्यतिथी दिनी कलमी आबां  रोपाचे वृक्षरोप करताना मान्यवर
दिवगंत प्रसादचे वडील प्रकाश सोनवणे व आई सौ.शोभना सोनवणे यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणी स्मरणात ठेवण्याचा निर्णय घेत. दरवर्षी वृक्षारोपण ,रक्तदान शिबीरे हेल्मेट वाटप आदी सामाजिक कार्यक्रम करत असतात त्यानुसार त्यानी आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कलमी आंबे या वृक्षाचे रोपण सरपंच सौ.अलका बापुसाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच बाबासाहेब भवर ग्रा.प.सदस्य संजय भोसले बजरगं दलाचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड मा. उपसरपंच संजय गायकवाड मुख्यध्यापक सविता भुसाळ गायकवाड शिक्षक राजश्री महामिने,नंदु शिंदे दिलीप बोरुडे,वर्षा दातीर आदी उपस्थित होते दिवंगत प्रसादची आठवण म्हणून सर्व रोपांचे संवर्धन करण्याचे आवाहनही सोनवणे कुटुंबाने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!