नेवासा प्रतिनिधी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नुकतेच गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात बाळासाहेब मुरकुटे हे भाजपाचे नेवाशाचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेला त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती.बदलत्या राजकीय समीकरणामुळे त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात मुरकुटे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली असून सर्वत्र पक्षप्रवेश सुरू आहेत.माजी आमदार असलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात प्रवेश केल्यामुळे नेवासा नगरपालिका निवडणुकीमध्ये बाळासाहेब मुरकुटे हे निवडणूक रिंगणात उतरू शकतात. त्यांच्या नेतृतवाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नेवाशामध्ये उमेदवार उभे करण्याची शक्यता त्यामुळेच हा प्रवेश असल्याचे बोलले जातेय.
