झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील राजकारणात रोज नवनवीन उलथापालथ होत असल्याचे दिसून येत आहे.सात्रळच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच घडली.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत योगेश चोरमुंगे,संजय चोरमुंगे, व राजेंद्र चोरमुंगे,शुभम चोरमुंगे, पियुष चोरमुंगे, रमेश पन्हाळे माजी उपसरपंच,वर्धमान चोरमुंगे, प्रतीक चोरमुंगे,व कार्यकर्ते यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पक्षासाठी संकेत मानले जात आहे.या पक्ष प्रवेशावेळी सात्रळचे माजी उपसरपंच रमेश पन्हाळे ,पद्मश्री कारखाना संचालक प्रकाश ताठे,ज्येष्ठ नेते जे. पी.जोर्वेकर सोमनाथ डोळे आणि,यांची विशेष उपस्थिती लाभली.
चोरमुंगे कुटुंबाचा पक्षप्रवेश ही केवळ औपचारिकता नसून,सात्रळ परिसरातील तरुण नेतृत्वाचा भाजपावर वाढत चाललेला विश्वास.याचे स्पष्ट द्योतक असल्याचे निरीक्षण मान्यवरांनी व्यक्त केले.चोरमुंगे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात उत्साहाचे वारं सुरू झाले असून गावातील तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
या तिघांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे ओळख निर्माण केली आहे.गावातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे हे कार्यकर्ते आता भाजपाच्या माध्यमातून विकासाच्या प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी होतील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भाजपात प्रवेश केल्यावर या तरुण कार्यकर्त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सात्रळ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांमध्ये तरुणांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असून,पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी चोरमुंगे कुटुंबाचा सहभाग अत्यंत उपयुक्त ठरेल,असे त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला.उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नव्या सदस्यांचे स्वागत केले.सात्रळ गावातील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य,ग्रामस्थ,तरुण कार्यकर्ते आणि प्रवरा उद्योग समूहाशी संलग्न लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी चोरमुंगे कुटुंबीयांनी व्यक्त केले की,‘गावाचा विकास, तरुणांना संधी,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सात्रळ परिसरातील पायाभूत सुविधांचा विस्तार ही आमची प्राथमिकता असेल.जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून आम्हाला यासाठी अधिक सक्षम व्यासपीठ मिळेल.
’’चोरमुंगे कुटुंबाचा प्रवेश हा सात्रळच्या राजकीय वातावरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात या तरुणांची भूमिकाही अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्षप्रवेशामुळे स्थानिक संघटनाला आणखी बळ मिळाले असून, गावातील तरुण पिढीला नवे नेतृत्व मिळाल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
