सिंधूताई भाऊसाहेब गागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त म्हैसगावात मोफत सर्व रोग निदान शिबिर

Cityline Media
0
म्हैसगांव कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील म्हैसगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य डॉ शशिकांत भाऊसाहेब गागरे यांच्या मातोश्री  दिवंगत सिंधूबाई भाऊसाहेब गागरे यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा नुकताच  म्हैसगांव येथील (गागरे वस्ती ) या ठिकाणी पार पडला.
दिवंगत सिंधुबाई गागरे हे म्हैसगांव माजी उपसरपंच सध्याची सदस्य राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. शशिकांत गागरे यांच्या आई होत्या.
मुलगा हा एक पशुवैद्यकीय डॉक्टर असल्याने दुःखाच्या वेदना त्यांना माहिती होत्या त्यांनी आपल्या आईला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

म्हैसगांव पासुन राहुरी,अहमदनगर ,व पुणे या ठिकाणी  वैद्यकीय उपचार सुरू होते.परंतु प्रयत्नांच्या अंती निराशा आली आणि आईची प्राणज्योत मालवली धडपड करून ती अयशस्वी झाले त्यांचे प्रयत्न असफल झाले त्यांनी यावेळी आई जाण्याने दुःख व्यक्त केले आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आईचे दुःख समजून लोकांना आजारापासून मुक्त होण्यासाठी म्हैसगाव मध्ये प्रथम पुण्यस्मरणच्या ठिकाणी साई माऊली सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारावर शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबीरात सर्वांचे नेत्र तपासण्यात करण्यात आले व ५०० रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले मोतीबिंदु शस्त्रक्रिया,गुडघेदुखी व सांधेदुखी तपासणी व निदान करून रुग्णांची मोफत तपासणी व औषध देऊन उपचार करण्यात आले यावेळी उच्चशिक्षित डॉ संतोष गिते हे उपस्थित होते .

प्रसंगी सर्व आजारावर शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यांचे ऑपरेशन करायचे आहे त्यांना देखील मदत केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले स्नेहभोजनानंतर घरी जात असताना प्रत्येक महिला ,पुरुष यांना झाडाची रोपे घेऊन आपल्या ते झाड आपल्या घरी चागल्या ठिकाणी लावा असे आवाहन करण्यात आले.

झाडे मोठे झाल्यावर ऑक्सिजनची निर्मिती होईल आजारपणाला त्यापासून मुक्त करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली प्रत्येक महिला व पुरुष यांना झाडे  वाटण्यात आली संगोपन करण्याचे  सांगण्यात आले या वेळी ह.भ.प कविराज महाराज झावरे यांचे झाले या कार्यक्रमास मा.राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच महाराष्ट्रात गाजलेली दिग्गज मंडळी हजर होती .
  
या वेळी केदारेश्वर निवासी लक्ष्मण महाराज पांचाळ , दिवंगत सिंदूबाई यांचे पती भाऊसाहेब गागरे ,मा.पोलिस पाटील भानुदास गागरे ,राहुरी बाजार समितीचे संचालक  बापुसाहेव गागरे अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते विलास गागरे ,विजय गागरे,पांडुरंग गागरे ,डॉ शशिकांत गागरे  जयेश गागरे आदी उपस्थित होते .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!