वरवंडी संपत भोसले -संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील सर्व जागृत नागरिक,बालपण इंग्लिश मिडियम स्कूल पानोडी,ग्रामस्थ आणि भिम क्रांती तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ व भीमक्रांती तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि विशेषतःपानोडी येथील बालपण इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक अध्यक्ष सोनाली मुंडे व अध्यापिका हर्षदा सागर मोघे, जयश्री वर्पे यांच्यासह अनेक विद्यार्थी ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यानी आपल्या भाषणाद्वारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले की आपण जे शिक्षण घेतो आपण जे रोजचे दैनंदिन जीवन हे संविधानाप्रमाणेच जगत आहोत.कु.स्वामिनी चिमण वाकचौरे, श्रेयस रामदास भोसले,आर्यन बापू गागरे यांच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
हे मुक्तपणे जगण्याचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉ .बाबासाहेबांमुळे मिळाला त्यांनी अथक प्रयत्नांनी दोन वर्ष १८ महिने १८ दिवस इतक्या कालावधीत जगातील सर्वात मोठे संविधान लिहून भारताला अर्पण केले ४१८ पाने व४३२ निप्स वापरून ४४८ कलमी २५ भाग आणि १२ परिशिष्टे असणारे संविधान आजच्या दिनी २६ नोव्हेंबर १९४० रोजी देशाला अर्पण केले. प्रत्येकाने आपण प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीयच राहिले पाहिजे असा विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त भाषणांचा अशय होता यावेळी अनेकांनी उपस्थिती दर्शविली.
