श्रीरामपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दीड कोटींचा निधी

Cityline Media
0
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुपूर्त

श्रीरामपूर‌ दिपक कदम महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील स्मारकाच्या उभारणीसाठी दीड कोटी रुपयांची निधी सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी नुकताच श्रीरामपूर येथे झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात समितीकडे सुपूर्त करण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच मा. खासदार सुजय विखे यांच्या हस्ते हा निधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, रमा धीवर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी खासदार सुजय विखे पाटील, तसेच सर्व आजी-माजी आमदार,खासदार, मा. नगराध्यक्ष,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  घोषणांनी परिसर दुमदुमला होता.शिवप्रेमी भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उभारणीला आता नवे बळ मिळाले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या १.५ कोटी निधीमुळे स्मारकाच्या कामाला गती मिळणार असून, लवकरच त्याची निविदा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम कार्य सुरू होणार आहे.

या उपक्रमामुळे सामाजिक समरसतेचा आणि बंधुत्वाचा संदेश पुन्हा एकदा समाजात दृढ झाला आहे. कार्यक्रमास श्रीरामपूर शहरातील नागरिक, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे  की, महामानव भारतरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी मिळाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर अनुयायांचे असलेले स्वप्न आता साकार होणार आहे.

 ऐतिहासिक स्मारक आपल्या हयातीत होत असल्यामुळे सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना याचा सार्थ अभिमान आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे सामाजिक न्यायाच्या कार्याला बळ देणारा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज  व भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब यांचे दोन्ही स्मारक सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल याचा श्रीरामपूरकरांना अभिमान आहे श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडली आहे यावेळी  विजय पवार सचिन ब्राह्मणे विशाल सुरडकर संजय रुपटक्के दादासाहेब बनकर  योगेश बनसोडे  मोहन आव्हाड अंतोन शेळके सुरेश जगताप महेंद्र त्रिभुवन संघराज त्रिभुवन दीपक कदम मिलिंद धीवर अर्जुन शेजवळ गोरख आढाव आदी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!