नाशिक दिनकर गायकवाड अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो पिकास बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. सततच्या पावसाने टोमॅटो झाडावरची पत्ती झडत चालल्याने उत्पादन खर्च निघतो की नाही अशी भीती वाटू लागली आहे. त्याचबरोबर द्राक्षबागांना देखील या पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर सततच्या पावडरी माराव्या लागत असल्याने उत्पादन खर्चात बाढ होत असून येणारे संभावित पीक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तारणार का,असा प्रश्न उभा राहिला आहे.
सततच्या ढगाळ बाताबरणामुळे द्राक्ष पीक बाचवण्यासाठी धडपड चालू आहे.महागडी औषधे आणून ती झाडांवर फवारून पीक वाचवण्यासाठी शेतकरी खर्च करत असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने पावसाचा मुक्काम अजून काही दिवस असल्याचे अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसास सुरुवात झाली होती. या काळात शेतात असलेले कांदा, गहू, मका आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेती मशागतीस वेळच मिळाला नाही. त्यामुळे भुईमूग, मका,
सोयाबीन ही पिके घेता आली नाही. नागपंचमीची लागवड असलेल्या टोमॅटोसदेखील पावसाने झोडपून काढले व हातात आलेल्या पिकास भाव मिळाला नाही व पावसाने झाडावरची पत्ती पडल्याने हे पीक देखील शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याचे शेतकरी बांधव सांगतात, तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. परंतु अवकाळी पावसाने हे पीक झोडपल्याने शेतातच आडवे झाले तर काहींचा भात शेतातच भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.शासनाने त्वरित शेतक-यांना सरसकट आर्थिक मदत करावी,अशी मागणी केली जात आहे.
