नाशिक दिनकर गायकवाड शिवाजीनगर परिसरात युवकाला कोयते व तलवारीचा धाक दाखवून लुट करणान्या तसेच म्हसोबा मंदिराजवळ गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या हल्लेखोरांना नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान पोलिसांनी रिक्षा चालक व प्रवासी अशा वेषात कामगिरी पार पाडत संशयितांना पकडले.
१३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता धनंजय दीपक सागवान (वय १८) याला ७ ते ८ तरुणांनी लोखंडी कोयते, तलवारी व बाहुबली प्रकारची हत्यारे दाखवून धमकावले. त्याच्याकडील मोबाईल,घडयाळ,चैन असा ऐवज हिसकावून नेला. शिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली.सागवान यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
ही घटना अत्यंत गंभीर असल्याने पोलीस उपायुक्त किशोर काबे,सहाय्यक पोलीत आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक बहेसाब नाईकवाडे यांनी गुन्ह्याचा तपास गतीमान करण्याच्या सूचना दिल्या.
तपास दरम्यान पोलीस हवालदार विशाल पाटील व महेंद्र जाधव यांना माहिती मिळाली की काही संशयित साईनगर येथील मोकळ्या मैदानावर येणार आहेत. संशयित आडदांड असल्याने पथकाने युक्ती आखली. हवालदार विशाल पाटील यांनी पिक्षा चालक,
तर महेंद्र जाधव, सागर आडमे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे प्रवासी बनले.संशयितांचा ठावठिकाणा निश्चित झाल्यावर 'पत्ता विद्यालयाच्या बहाण्याने रिक्षा बेट त्यांच्या जवळ नेण्यात आली आणि क्षणातच छापा टाकून संशयीतांना ताम्यात घेतले.
कारवाईत हल्लेखोर राकेश उर्फ राका संपत लोंढे, प्रजल उर्फ पज्या गुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या शेलार आणि एक अल्पवदीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुटलेला ऐवज, तसेच ६ ते ७ धारदार कोयते, तलवारी व बाहुबली हत्यारे जम करण्यात आली. इतर पाथ आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, राहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमघर, महेंद्र जाधव, विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे, नितीन भामरे, अजय देशमुख, संतोष पिंचक आर्दीच्या पथकाने केली.
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा जप्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
