केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदी दर्शन आढाव याची नियुक्ती;मायभूमी लहित बुद्रुक येथे भव्य सत्कार

Cityline Media
0
पोलिस उपनिरीक्षक दर्शन संदेश आढाव यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभ व सन्मान सोहळ्यास गावकऱ्यांची उपस्थिती

अकोले प्रतिनिधी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली असलेल्या भारतातील पाच सुरक्षा दलांच्या नामांकनाचा संदर्भ देते.त्यांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे याच दलात पोलीस उपनिरीक्षक पदी अकोले तालुक्यांचे भुषण ठरलेले दर्शन संदेश आढाव यांची निवड झाली त्या निमित्ताने आपले माय भूमी असलेल्या  लहित बुद्रुक येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ व सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
लोकांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या उपस्थितीने हा क्षण खास व्हावा यासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत कर्पे,यांनी केले प्रास्ताविक,भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाचे मा.प्राचार्य,एस.के चौधरी यांनी केले मुळा खोऱ्याचे ज्येष्ठ नेते,अध्यक्षपदी भाऊसाहेब रक्टे होते,नागरी सत्कार समारंभाचे अध्यक्ष स्थानी असलेले भाऊसाहेब रक्टे म्हणाले की यावेळेस दर्शन आढाव यांच्या यशाच्या पाठीमागे त्याचे वडील संदेश आढाव यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. संदेश आढाव यांच्या अपार संघर्षाने मुलगा अधिकारी होऊ शकला हे सगळं श्रेय संदेश आढावा यांना जाते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव म्हणाले की दर्शन यांनी पुढील जीवनामध्ये आपल्या वडिलांचा संघर्ष लक्षात घेऊन देशसेवा व सामाजिक सेवा करावी असे आपले मत व्यक्त केले.

दर्शन आढाव पोलीस उपनिरीक्षकर केंद्रीय सशस्र पोलीस दल भारत सरकार यांचा सत्कार अध्यक्ष भाऊसाहेब रक्टे यांचे हस्ते, करण्यात,यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, शिवसेनेचे मारुती मेंगाळ,संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनू गायकवाड,
प्रसंगी ,उपविभागीय पोलिस अधिकारी,दीपक मांडे यांचा सत्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अकोले तालुका शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला, मंचावर उपस्थित अन्य मान्यवर यांचाही आढाव परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता अनेक मान्यवरांच्या मनोगताने करण्यात आली आभार,शैलेश घनवट यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसाद आढाव यांनी परिश्रम  घेतले तसेच लहित बुद्रुक येथील तरुण मित्रांनी देखील सहकार्य केले,विशेष सहकार्य समर्थ उद्योग समूहाचे मालक वाल्मीक चौधरी तसेच संदेश आढाव यांचे सहकारी मित्र ऊद्योजक बाळासाहेब बालोडे व सुनील ढगे यांनी केले त्यांचे यावेळी आभार,व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांचे आणि ग्रामस्थांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीत अकोले शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, उपजिल्हाप्रमुख शिवसेना मारुती मेंगाळ, समर्थ उद्योग समूहाचे वाल्मीक चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख . उबा.ठा. प्रभाकर फापाळे, लहित मा.सरपंच वर्षा चौधरी, सरपंच लहित बुद्रुक मंगल चौधरी, उपसरपंच लहित बुद्रुक विवेक चौधरी, सरपंच वाघापूर रंजना बराते, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास शेळके, उद्योजक मुंबई रविंद्र चौधरी, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य महादेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शैलेश घनवट, मातोश्री विमल तात्याबा चौधरी, गणेश कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहित बुद्रुक  मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव मोहिते,लहित विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सुनील चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अनिल चौधरी,सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाराते,कामगार पोलीस पाटील गणेश पवार, सोसायटी संचालक लिंगदेव गणेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य लहित बुद्रुक ज्ञानदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव चिमाजी चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते बादशहा गायकर,भजनी मंडळ सदस्य बाळासाहेब चौधरी, अनिल रकटे,नारायण चौधरी, संजय चौधरी, बाळासाहेब बोराडे, गणेश घनवट, बाळासाहेब नवले, राधेश्याम बोराडे, बाळासाहेब दशरथ बोराडे, शंकर चौधरी, बाळासाहेब शेळके, लक्ष्मण चौधरी, अशोक शेळके,(चास) अरुण चौधरी, यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी श्री लिंगेश्वर हायस्कूलच्या वस्तीगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निकिता गायकवाड, आराध्या गायकवाड, रामनाथ गायकवाड, मातोश्री अनिता आढाव, वडील संदेश आढाव, चुलते दीपक आढाव,तानाजी आढाव  आजी- आजोबा शालन आढाव,प्रकाश आढाव चुलती सीमा आढाव, मयुरी आढाव, सविता आढाव,आणि परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!