नाशिक दिनकर गायकवाड- दुकानात असलेल्या २० लाख रुपये किमतीच्या १८ हजार किलो वजनाच्या बॅटऱ्यांचे स्क्रॅप व रोख रक्कम असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत त्याचा अपहार केल्याविरुद्ध तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आझमखान अहमदखान पठाण (रा. चौरे मळा, ओझर मिग) यांचे पखाल रोड येथे नॅशनल एंटरप्रायजेस नावाचे बॅटरी स्क्रॅप
खरेदी-विक्रीचे दुकान आहे. आरोपी दानिश राजू पठाण, तौसिफ शफिक गौरी खान व माजिद खान (तिघांचीही पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांनी दि. १४ ते १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दुकानात प्रवेश केला व दुकानात असलेले २० लाख रुपये किमतीचे बॅटरी स्क्रॅप व एक लाखाची रोकड असा २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून त्याचा अपहार केला.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डेग करीत आहेत.
