संगमनेरात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा
संगमनेर प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून धनगर व बंजारा समाजाने आरक्षण मागणी केल्यामुळे आदिवासी समाजात पुन्हा संभ्रमाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.खोट सांगून गैरसमज पसरवून तरुणांना भडकले जात आहेत. या संदर्भात जनतेचे प्रबोधन व्हावे. सत्य समोर यावे. सत्ताधाऱ्यांनी समाजात लावलेले संघर्ष थांबावेत,समाजातील सलोखा कायम रहावा.आणि आरक्षणाचे तत्व अबाधित रहावे. या करिता,आज दि. १ नोव्हेंबर रोजी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या की
१) बंजारा किंवा धनगर आरक्षणाच्या निमित्ताने असंविधानिक मागणी करुन सामाजिक तेढ निर्माण करुन वाद लावणाऱ्यांवर कारवाई करावी.
२) यापुढे कुठलीही जात किंवा जमात आदिवासीमध्ये समाविष्ट करु नये.
यावेळी जाणता राजा मैदानावरून मोर्चा सुरू झाला. बस स्थानकासमोर ' बोहडा ' आदिवासी नृत्य रंगले.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना राघोजी भांगरे व एकलव्य यांची वेशभूषा केलेल्या तरुणांनी अभिवादन करून मोर्चा प्रांत कार्यालयावर जोरदार घोषणा देत पोहचला.
आरक्षण आमच्या हक्काचे..आरक्षण चुराने वालोंको.. समाजात भांडण लावणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो". या घोषणा देण्यात आल्या.प्रसंगी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चा समोर चेतन कांबळे यांनी प्रस्तावना केली.अतुल कवटे, तुळशीराम कातोरे, भास्कर बर्डे, दत्ता ढगे, स्वप्नील धांडे, सागर डोके,संदीप कोकाटे,शिंदे संजयकुमार, शिवाजी ढवळे यांचे प्रमुख भाषण झाले. डॉ.जालिंदर घिगे यांनी आभार मानले.व बाळकृष्ण गांडाळ यांनी सूत्रसंचालन केले.
