३५ फुट खोल लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून वृद्धाचा मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड इमारतीच्या दुसन्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसण्यासाठी ६५ वर्षीय वृद्धाने लोखंडी संरक्षित दरवाजा उघडून लिफ्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता लिफ्ट तेथे नव्हती तर तिसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळे वृद्धाचा थेट ३५ फूट खोल खड्चात कोसळून मृत्यू झाला हरविंदरसिंग सदयोरा असे मृत वृद्धाचे नाव आहे.
काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिरावाडीतील पाटालगत असलेल्या दामोदरराज नगर मधील केशव हरी अपार्टमेंटमध्ये ही दुर्घटना घडली.अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासमवेत राहणारे हरविंदरसिंग यांना बाहेर जायचे होते. त्यासाठी ते लिफ्टमध्ये बसण्यासाठी गेले. लोखंडी संरक्षित जाळीचा दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांना लिफ्ट समोरच आहे,असे वाटले; मात्र लिफ्ट वरील मजल्यावर होती. त्यांनी लिफ्टमध्ये पाय ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र ते तोल जाऊन थेट खाली तळमजल्यापर्यंत खड्यात कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

ही घटना माजी नगरसेवक पूनम मोगरे, दिगंबर मोगरे यांना समजताच ते तातडीने घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले व अग्निशमन दलासह रुग्णवाहिकेची मदत मागितली. अमृतधाम येथील विभागीय केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, लिडिंग फायरमन विजय चव्हाणके, शिवाजी मतवाड, बंबचालक कांतीलाल कवर यांच्यासह प्रशिक्षणाथ फायरमन यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. लिफ्टच्या खड्‌ड्यात पडलेल्या वृद्धाला बाहेर काढण्यासाठी बोरसे हे दोरखंड घेऊन खाली उतरले. त्यांनी दोरखंड बांधून त्याच्या आधारे अन्य जवानांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेमधून हरविंदर सिंग यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून हरविंदर सिंग यांना मृत घोषित केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!