कुंभमेळा पार्श्वभूमीवर ३०० कोटीच्या रस्ते कामाची निविदा प्रसिद्ध

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन हजार कोटींची कामे होणार आहेत. गेल्या आठवड्यात नऊ कामांसाठी २९८ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
शहरात मार्च २०२७ पर्यंत एकूण १ हजार २६८ कोटींची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील ९३० कोटींच्या रस्ते कामांना मुहूर्त लागल्यानंतर सिंहस्थ प्राधिकरणाने २९८ कोटींच्या रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी दिली.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधींची कामे होणार आहेत.रस्ते कामास विलंब होऊ नये,याकरिता पालिकेच्या बांधकाम विभागाने आधीच आराखडा तयार करून ठेवला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सिंहस्थ प्राधिकरण याकामांना प्रशासकीय मंजुरी देत आहे. रस्त्याबरोबरच पूल,

 कामांसाठी निविदा प्रसिद्ध
नाशिकरोड मालधक्का व रेल्वे स्टेशन १० कोटी ५ लाख मार्च २०२७ नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सत्कार पॉईंट रस्ता ११ कोटी ६५ लाख मार्च २०२७, अमृत मिरवणूक मार्ग अमृत मिरवणूक मार्ग विकसित करणे-२५ कोटी मार्च २०२५, मुंबई नाका ते गडकरी सिन्गल,त्र्यंबक नाका पर्यत रस्ता विकसित करणे (व्हाईट टॅपिंग)-१४ कोटी ४३ लाख, चांदशी पूल ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कल ते सीटी सेंटर मॉल पूल विकसित करणे ५९ कोटी ५९ लाख-मार्च २०२७, सिटी सेंटर मॉल पूल ते इंदिरानगर बोगद्यापर्यतचा रस्ता-१३ कोटी १९ लाख, टाकळी मलःनिस्सारण केंडू पूल ते निलिगिरी बाग ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, रासबिहारी शाळा, राष्ट्रीय महामार्ग ४ ते राजस्वीट चौक, दिंडोरी रोड ते आरटीओ कार्यालय पेठरोड ते मखमलाबाद रस्ता एकूण खर्च १२९ कोटी २३ लाख, पिंपळगांव खांब फाटा ते वडनेर गेट पर्यतचा रस्ता विकसित करणे-१८ कोटी- मार्च २०२७, पाथर्डी फाटा ते पिंपळ्गाव खांब रस्ता-१७ कोटी ४१ लाख.

पाणीपुरवठा योजना, मलवाहिकांचा विस्तार, आरोग्य, स्वच्छता आदी कामे महापालिका प्रशासन आपल्या माध्यमातून करणार आहे. महापालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन त्यांची वाट मोकळी करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.पहिल्या टप्प्यात शहरातील १८ ठिकाणच्या रस्ते कामांची निविदा

प्रक्रिया राबविली जात असून लवकरच या कामांसाठी ठेकेदार संस्था नियुक्ती केली जाणार आहे. लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. एकूण २१६८ कोटींच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना प्राधान्य दिले जात आहेत.यात रस्त्याच्या कामांना १५ महिन्यांपेक्षा अवधी लागणार असल्याने रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे नियोजन आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!